कधी कळणारे रे तुला. प्रेम कुणावर करायचं ...........
निस्तच रूप पाहून करायचं
तिच्यावर खूप मरायचं
आणि क्षणार्धात सार काही मोडायचं.....
म खूप रडायचं
कधी कळणारे रे तुला. प्रेम कुणावर करायचं ...........
एक डाव मोडला म्हणून
तु दुसरा डाव मांडतो
खूप प्रेम करतो तुझ्यावर
तिलाही तेच सांगतो
पुन्हा तिसरीच्या पायापुढे रांगतो
कशाला अर्थे डाव मांडतो
कधी कळणार रे तुला प्रेम कुणावर करायचं .................
प्रेम एकनिष्ठ राहून करायचं
ती रागावली म्हणून तिला नाय सोडायचं
प्रेमात अतूट साथ हवी ..........
प्रत्याकाच्या तोंडी तुझ्या आणि तिच्या
प्रेमाची बात हवी
सोडणा हे तुला नाही समजायचं
कधी कळणार रे तुला प्रेम कुणावर करायचं....
Thursday, February 25, 2016
कधी कळणारे तुला...।
Tuesday, April 1, 2014
बसतेस झेव्हा तू खिडकित... एक अनुभवी कविता...
बसतेस जेव्हा खिडकित
वाट माझी बघताना....
दिसतो तुझ्या चेहऱ्यावर
मी दिसण्याचा आनंद.....
दिसतेस सुंदर तेव्हा
बघतेस तू मला.....
हसतेस गोड तेव्हा
बघतेस तू मला.....
लाजते सुंदर जेव्हा
पाहतो मी तुला.....
तूझ्या त्या लजन्याने
दुःख होत विसरायला....
जनु काही देवाने बनवले
तुला फक्त मला सुख द्यायला....
-नितिश मुंगसे
Monday, March 12, 2012
का बर.!
का बरं मला तुझी आठवण यावी...?जीवाची अशी घालमेल व्हावी....?सारं काही जवळ असुनही,दूर असल्याची जाणीव व्हावी.....?
आठवताहेत ते क्षण,जांच्यावर जगतेय अजुनपण,सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,खेचणारे असे हे क्षण
आठवतेय तो सारा पसारा,जो, पसरलाय सैरावैरा,त्यातूनच तुझा तो इशारा,तेव्हा अंगावर आलेला शहारा.....!
एवढे सर्व असुनही,का बरं मला तुझी आठवण यावी...?जीवाची अशी घालमेल व्हावी..........!
आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,मग स्वत:च बोलणं,नाहीतर दोन - चार दिवस थांबून,मी बोलतेय का हे बघणं......!
वाटतं ही वेळ अशी,चुटकित सरून जावी,आणि शेवटी कायमची,आपली गाठभेट व्हावी.......!
आठवतेय तो सारा पसारा,जो, पसरलाय सैरावैरा,त्यातूनच तुझा तो इशारा,तेव्हा अंगावर आलेला शहारा.....!
एवढे सर्व असुनही,का बरं मला तुझी आठवण यावी...?जीवाची अशी घालमेल व्हावी..........!
आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,मग स्वत:च बोलणं,नाहीतर दोन - चार दिवस थांबून,मी बोलतेय का हे बघणं......!
वाटतं ही वेळ अशी,चुटकित सरून जावी,आणि शेवटी कायमची,आपली गाठभेट व्हावी.......!
Friday, March 2, 2012
आजकाल इथं आम्ही दोघंच असतो
आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
आजकाल तसं दुस-या कुणाशी
तासन तास दोघं बोलत बसतो,
.. निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..
पहाटे..
किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
'आता स्वप्नांतही भेटणं नाही,
असंच काहीसं बडबडतो..
खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…
तेव्हा त्याला मी हळूच सांगतो
की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.
तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो..
गुन्हा फक्त इतकाचं झाला
गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.....
प्रेम मी करतचं राहिलो ,
तू फक्त व्यस्त राहिलीस...
मी मात्र धावतचं राहिलो ,
तू मात्र पाहतचं राहिलीस...
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलीस...
आठवणी मात्र येत असतात,
मी अश्रू पुसत राहतो...
जिथे असशील तिथे खूप सुःखी राहा,
पण मी तुझी वाट पाहत
राहीन.....
- एक अनामिक (नितीश)
Tuesday, February 21, 2012
आजही पुन्हा तेच झाले....!
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे वेडं लागले
येताच आठवण तुझी मनाला खुप सावरले
...तरीही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले
कुणी नाही तु माझी
मनाला खुप समजावले
तरीही पुन्हा तेच झाले
मन तुझ्याविना उदास झाले
जगायचे आयुष्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहीले
तरी पुन्हा तेच झाले
तुझ्याविना आयुष्य नकोसे झाले
Sunday, February 19, 2012
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिल
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिल
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
का उगाच झाकिसी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंद या तुझ्या मिठीत देहभान हरपले
मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रुप देखणे बघून नयन हे सुखावले.....
Sunday, February 5, 2012
मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो.............
![]() |
| एक अनामिक |
माझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचं.
नकळत का होईना मी हि हरवून जायचो,
कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो.
दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो,
हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो.
नाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचो,
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ,
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो.
सगळंच आता भूतकाळात विरून गेलं,
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,
जाता जाता मला खूप वेदना दिल्या,
पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं.
जाता जाता खूप काही शिकवून गेलं,
किती तरी नाती आपण गृहीत धरतो त्यांचं अस्तित्वच आपण Assume करतो.
समजत नाही कधी मोल नात्यांचं आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं आज खरंच समाधान वाटतंय कि मी हि कधी प्रेम केलं होतं.
खरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतं,
जाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.
एक अनामिक
Saturday, February 4, 2012
ती ....आणि तिचे वर्णन
तिच्या मखमली शब्दांचा जेव्हा
कानांना स्पर्श होतो,
कान तृप्त होतात
आणि मनालाही हर्ष होतो.....
वाटते सदैव तिने
माझ्याशी बोलत राहावे,
भावना समजून घेऊन
नुसते शब्दांशी खेळत राहावे....
ती हसली कि हृदय कसे
शहारून जाते,
वसंतात वृक्ष जसे पुष्पांनी
मोहरून जाते.....
तिचे खोटे खोटे रुसणे पण
वेड लाऊन जाते,
जसे तात्पुरते ग्रहनही
सूर्यालाच झळ लाऊन जाते...
ती रागावली ना
तर मग कुणाचीच काही खैर नसते,
शब्दांची तिची गाडी अशा वेळी
अगदी स्वैर सुटते....
तिची समजूत काढण्यात
एक वेगळीच मजा असते,
पण तिने अबोला धरला कि
ती मोठी सजा असते......
माझ्या भावनांना
सार्थ तूच आहेस,
माझ्या प्रत्येक शब्दाचा
अर्थ तूच आहेस......
तुझ्यावाचून जीवनाला
काय अर्थ आहे???
तूच एक सत्य
बाकी सगळे व्यर्थ आहे..
कानांना स्पर्श होतो,
कान तृप्त होतात
आणि मनालाही हर्ष होतो.....
वाटते सदैव तिने
माझ्याशी बोलत राहावे,
भावना समजून घेऊन
नुसते शब्दांशी खेळत राहावे....
ती हसली कि हृदय कसे
शहारून जाते,
वसंतात वृक्ष जसे पुष्पांनी
मोहरून जाते.....
तिचे खोटे खोटे रुसणे पण
वेड लाऊन जाते,
जसे तात्पुरते ग्रहनही
सूर्यालाच झळ लाऊन जाते...
ती रागावली ना
तर मग कुणाचीच काही खैर नसते,
शब्दांची तिची गाडी अशा वेळी
अगदी स्वैर सुटते....
तिची समजूत काढण्यात
एक वेगळीच मजा असते,
पण तिने अबोला धरला कि
ती मोठी सजा असते......
माझ्या भावनांना
सार्थ तूच आहेस,
माझ्या प्रत्येक शब्दाचा
अर्थ तूच आहेस......
तुझ्यावाचून जीवनाला
काय अर्थ आहे???
तूच एक सत्य
बाकी सगळे व्यर्थ आहे..
Wednesday, January 25, 2012
Tuesday, January 24, 2012
रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी...
रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी
विसरून जाइन तुला समजून किती रडलो मी
का तूला आठवू... हाच विचार करतो मी
अळव्यावरच्या थेम्बा प्रमाने क्षण क्षण मरतो मी
नाही कधी जाणार आपण भेटायचो जिथे
मनात माझ्या रोज ठरवतो मी
तुझी अनुपस्तिथि असल्याने जीवनात
रोज तिथे एकांतात रडतो मी
नको दिसावा तुझा चेहरा
रोज देवास पाया पडतो मी
पाकिटातला तुझा फोटो फाड़ताना
गलातल्या त्या खलीवर रडतो मी
एकपण वस्तु तुझी का ठेवावी जवळ
म्हणुन कपाटातल्या सर्व वस्तु काढतो मी
प्रत्येक वस्तु एकदा हृदयाला लाउन
मुक्त कंठाने रडतो मी .......
Sunday, September 18, 2011
ती असावी
| Nits |
कुठे म्हणालो परी असावी
कधीतरी पण घरी असावी
हवी कुणाला छचोर मैना ?
वरायला छोकरी असावी
तरुस घरदार मानणारी
अशी कुणी वानरी असावी
नको अवाढव्य बॅंड-बाजा
फुकायला बासरी असावी
नकोय काकूसमान पण ती
जरा तरी लाजरी असावी
नकोत लुगडी जुनेर सूती
कधी तरी भरजरी असावी
उसळ नको अन् नको आमट्या :(
खमंग मुर्गी करी असावी
नको "वहाव्वा", "सुरेख", "उत्तम"
विडंबनं बोचरी असावी
विदीर्ण झालास 'खोडसाळा'
तिची जिव्हा कातरी असावी..
कधीतरी पण घरी असावी
हवी कुणाला छचोर मैना ?
वरायला छोकरी असावी
तरुस घरदार मानणारी
अशी कुणी वानरी असावी
नको अवाढव्य बॅंड-बाजा
फुकायला बासरी असावी
नकोय काकूसमान पण ती
जरा तरी लाजरी असावी
नकोत लुगडी जुनेर सूती
कधी तरी भरजरी असावी
उसळ नको अन् नको आमट्या :(
खमंग मुर्गी करी असावी
नको "वहाव्वा", "सुरेख", "उत्तम"
विडंबनं बोचरी असावी
विदीर्ण झालास 'खोडसाळा'
तिची जिव्हा कातरी असावी..
Friday, September 16, 2011
नाही विचारले मी तिला................
ती आवडली पण मी नाही विचारले तिला
Delete करेल Friends लिस्ट मधून ती मला
बोलणार नाही माझ्याशी म्हणून
नाही विचारले मी तिला...............
चुकीच्या नजरेने पाहिलं ती मला म्हणून
नाही विचारले मी तिला ...............
एक गैरसमज करून घेईल ती माझ्या बद्दलचा म्हणून
नाही विचारले मी तिला ...............
समोर कसा जाणार तीच्या म्हणून
नाही विचारले मी तिला .............
भेटून सुद्धा नाही भेटणार म्हणून
नाही विचारले मी तिला ................
कोणाला सांगूही शकणार नव्हतो की किती आवडते ती मला
कसा सांगणार मी तिला की खूप आवडतेस तू मला
भीती वाटते एका नाही ची म्हणून
नाही विचारले मी तिला .......................
आजुन किती Valentine Days निघून जातील पण
नाही विचारणार मी तिला.............
राहू दे मला या गोड अशा गैरसमजुतीत की आवडतो मी तिला .........आवडतो मी तिला ......
Delete करेल Friends लिस्ट मधून ती मला
बोलणार नाही माझ्याशी म्हणून
नाही विचारले मी तिला...............
चुकीच्या नजरेने पाहिलं ती मला म्हणून
नाही विचारले मी तिला ...............
एक गैरसमज करून घेईल ती माझ्या बद्दलचा म्हणून
नाही विचारले मी तिला ...............
समोर कसा जाणार तीच्या म्हणून
नाही विचारले मी तिला .............
भेटून सुद्धा नाही भेटणार म्हणून
नाही विचारले मी तिला ................
कोणाला सांगूही शकणार नव्हतो की किती आवडते ती मला
कसा सांगणार मी तिला की खूप आवडतेस तू मला
भीती वाटते एका नाही ची म्हणून
नाही विचारले मी तिला .......................
आजुन किती Valentine Days निघून जातील पण
नाही विचारणार मी तिला.............
राहू दे मला या गोड अशा गैरसमजुतीत की आवडतो मी तिला .........आवडतो मी तिला ......
Monday, July 25, 2011
खूप दिवसापास्न चाललय डोक्यात...
ठरवून काही कविता होत नाही..
खरंच..पटलय आता मनाला...
डोळ्यात पाणी दाटत...अश्रू सुसाट वाहतात...पण शब्द मात्र फुटत नाहीत..
पण ती असताना जमलच नाही कधी...
होतं कुणीतरी हक्काचं माझ्या...जिच्यासाठी कविता केली असती मी..
आणी झालंच जरी..तर कोण बसणारे बघत..आहे का तेवढा वेळ कुणाला..
देवालाही जरा आपल्या परीक्षेत नापास करावं..
कधी कधी वाटत..काही तरी मोठं...
प्रेम
प्रेम दोन शब्दांचे खेळ नसते,
निव्वळ छेद-छेडीची वेळ हि नसते,
खरंतर प्रेमाची प्रत्येकाची,
वेगळीच एक व्याख्या असते.....
प्रेम म्हणजे....
प्रत्येक श्वासात - प्रत्येक क्षणात,
प्रत्येक सुखात - प्रत्येक दुखात,
एक-मेकांना साथ देण्याची वेळ असते
प्रेम म्हणजे....
त्याचं तुझ्यावर - तुझं त्याच्यावर,
स्वतःही पेक्षा जास्त,
विश्वास असण्याची गरज....
प्रेम म्हणजे....
एक-मेकांचा आदर,
एक-मेकांच्या भावनेचा आदर,
एक-मेकांच्या शब्दांचा आदर असणे...
प्रेम म्हणजे....
एक-मेकांसाठी हसत - हसत मारण्याची,
कधी मरत - मरत जगण्याची,
एक-मेकासाठी सगळं काही त्यागायची वेळ...
प्रेम म्हणजे....
निर्मल मैत्री,
एक-मेकासमोर मन मोकळं करण्याची बेधडकता,
अतूट सोबत असण्याची खात्री....
प्रेम म्हणजे....
एक-मेकांत जीव गुंतवणे,
दोन शरीर एक आत्मा होणे,
एक जीव होणे...
प्रेम म्हणजे काय असतं,
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
ते सगळ्यांच्याच नशिबात नसतं,
अन् ज्यांना मिळतं,
त्यांनी ते जीवापाड जपायचं असतं..
माझ्यासाठी प्रेम म्हणजे,
तुझ्या आठवणीत जगणे,
त्यांना जीवापाड जपणे,
फक्त त्यांना जपायसाठीच जगणे
निव्वळ छेद-छेडीची वेळ हि नसते,
खरंतर प्रेमाची प्रत्येकाची,
वेगळीच एक व्याख्या असते.....
प्रेम म्हणजे....
प्रत्येक श्वासात - प्रत्येक क्षणात,
प्रत्येक सुखात - प्रत्येक दुखात,
एक-मेकांना साथ देण्याची वेळ असते
प्रेम म्हणजे....
त्याचं तुझ्यावर - तुझं त्याच्यावर,
स्वतःही पेक्षा जास्त,
विश्वास असण्याची गरज....
प्रेम म्हणजे....
एक-मेकांचा आदर,
एक-मेकांच्या भावनेचा आदर,
एक-मेकांच्या शब्दांचा आदर असणे...
प्रेम म्हणजे....
एक-मेकांसाठी हसत - हसत मारण्याची,
कधी मरत - मरत जगण्याची,
एक-मेकासाठी सगळं काही त्यागायची वेळ...
प्रेम म्हणजे....
निर्मल मैत्री,
एक-मेकासमोर मन मोकळं करण्याची बेधडकता,
अतूट सोबत असण्याची खात्री....
प्रेम म्हणजे....
एक-मेकांत जीव गुंतवणे,
दोन शरीर एक आत्मा होणे,
एक जीव होणे...
प्रेम म्हणजे काय असतं,
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
ते सगळ्यांच्याच नशिबात नसतं,
अन् ज्यांना मिळतं,
त्यांनी ते जीवापाड जपायचं असतं..
माझ्यासाठी प्रेम म्हणजे,
तुझ्या आठवणीत जगणे,
त्यांना जीवापाड जपणे,
फक्त त्यांना जपायसाठीच जगणे
तू का असं वागतेस ?
मला पाहुनसुध्दा न पाहिल्यासारखं करतेस,
तू का असं वागतेस ?
फोनवरून गप्पा करतेस आणि भेटल्यावर अबोली होतेस,
तू का असं वागतेस ?
भेटीला बोलविले तर तूच उशिरा येतेस
आणि मला वाट पहायला लावतेस,
तू का असं वागतेस ?
माझ्या बावळटपणांवर मात्र खुदकन हसतेस
आणि मी हसलो तर लगेच रागवतेस,
तू का असं वागतेस ?
माझे गुणदोष दोन्ही मान्य करतेस
आणि तुझे गुणदोष मात्र तू लपवतेस,
तू का असं वागतेस ?
'प्रेम' माझ्यावर करतेस आणि
तेहि तू तुझ्या नखयातून दाखवतेस,
तू का असं वागतेस ?
तू का असं वागतेस ?
फोनवरून गप्पा करतेस आणि भेटल्यावर अबोली होतेस,
तू का असं वागतेस ?
भेटीला बोलविले तर तूच उशिरा येतेस
आणि मला वाट पहायला लावतेस,
तू का असं वागतेस ?
माझ्या बावळटपणांवर मात्र खुदकन हसतेस
आणि मी हसलो तर लगेच रागवतेस,
तू का असं वागतेस ?
माझे गुणदोष दोन्ही मान्य करतेस
आणि तुझे गुणदोष मात्र तू लपवतेस,
तू का असं वागतेस ?
'प्रेम' माझ्यावर करतेस आणि
तेहि तू तुझ्या नखयातून दाखवतेस,
तू का असं वागतेस ?
Subscribe to:
Posts (Atom)





