Monday, March 12, 2012

का बर.!


का बरं मला तुझी आठवण यावी...?जीवाची अशी घालमेल व्हावी....?सारं काही जवळ असुनही,दूर असल्याची जाणीव व्हावी.....?
आठवताहेत ते क्षण,जांच्यावर जगतेय अजुनपण,सतत तुला माझ्याकडे आणि माला तुझ्याकडे,खेचणारे असे हे क्षण
आठवतेय तो सारा पसारा,जोपसरलाय सैरावैरा,त्यातूनच तुझा तो इशारा,तेव्हा अंगावर आलेला शहारा.....!
एवढे सर्व असुनही,का बरं मला तुझी आठवण यावी...?जीवाची अशी घालमेल व्हावी..........!
आठवतेय तुझं चिडणं - रागावणं,मग स्वत: बोलणं,नाहीतर दोन - चार दिवस थांबून,मी बोलतेय का हे बघणं......!
वाटतं ही वेळ अशी,चुटकित सरून जावी,आणि शेवटी कायमची,आपली गाठभेट व्हावी.......! 

Friday, March 2, 2012

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो

आजकाल इथं आम्ही दोघंच असतो..



माझा एकांत आणि मी.

आजकाल तसं दुस-या कुणाशी

फारसं पटत नाही..

तासन तास दोघं बोलत बसतो,


.. निश्चल अंधाराच्या काठाशी,

कधी मनात जपलेल्या वाटांशी..
पहाटे..

किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.

मग मी घड्याळाला गप्प करतो.

'आता स्वप्नांतही भेटणं नाही,
असंच काहीसं बडबडतो..

खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…

तेव्हा त्याला मी हळूच सांगतो

की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.

तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो.. 

गुन्हा फक्त इतकाचं झाला


गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.....
प्रेम मी करतचं राहिलो ,
तू फक्त व्यस्त राहिलीस...
मी मात्र धावतचं राहिलो ,
तू मात्र पाहतचं  राहिलीस...
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं  राहिलीस...
आठवणी मात्र येत असतात,
मी अश्रू पुसत राहतो...
जिथे असशील तिथे खूप सुःखी राहा,
पण मी तुझी वाट पाहत 
राहीन.....

- एक अनामिक (नितीश)