Tuesday, February 21, 2012

आजही पुन्हा तेच झाले....!

आजही पुन्हा तेच झाले


मनाला माझ्या फक्त तुझे वेडं लागले

येताच आठवण तुझी मनाला खुप सावरले

...तरीही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले
कुणी नाही तु माझी
मनाला खुप समजावले
तरीही पुन्हा तेच झाले
मन तुझ्याविना उदास झाले
जगायचे आयुष्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहीले
तरी पुन्हा तेच झाले
तुझ्याविना आयुष्य नकोसे झाले 

Sunday, February 19, 2012

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिल


पाहिले न मी तुला, तू मला न पाहिल
ना कळे कधी कुठे, मन वेडे गुंतले
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातूनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
का उगाच झाकिसी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोड स्पर्श तुझा चंदनी
धुंद या तुझ्या मिठीत देहभान हरपले
मृदूशय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रुप देखणे बघून नयन हे सुखावले.....

Sunday, February 5, 2012

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो.............

एक अनामिक 
मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो,
माझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचं.

नकळत का होईना मी हि हरवून जायचो,
कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो.

दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो,
हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो.

नाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचो,
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ,
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो.

सगळंच आता भूतकाळात विरून गेलं,
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,

जाता जाता मला खूप वेदना दिल्या,
पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं.

जाता जाता खूप काही शिकवून गेलं,
किती तरी नाती आपण गृहीत धरतो त्यांचं अस्तित्वच आपण Assume करतो.

समजत नाही कधी मोल नात्यांचं आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं आज खरंच समाधान वाटतंय कि मी हि कधी प्रेम केलं होतं.

खरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतं,
जाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.


एक अनामिक 

Saturday, February 4, 2012

ती ....आणि तिचे वर्णन

तिच्या मखमली शब्दांचा जेव्हा
कानांना स्पर्श होतो,
कान तृप्त होतात
आणि मनालाही हर्ष होतो.....
वाटते सदैव तिने
माझ्याशी बोलत राहावे,
भावना समजून घेऊन
नुसते शब्दांशी खेळत राहावे....
ती हसली कि हृदय कसे
शहारून जाते,
वसंतात वृक्ष जसे पुष्पांनी
मोहरून जाते.....
तिचे खोटे खोटे रुसणे पण
वेड लाऊन जाते,
जसे तात्पुरते ग्रहनही
सूर्यालाच झळ लाऊन जाते...
ती रागावली ना
तर मग कुणाचीच काही खैर नसते,
शब्दांची तिची गाडी अशा वेळी
अगदी स्वैर सुटते....
तिची समजूत काढण्यात
एक वेगळीच मजा असते,
पण तिने अबोला धरला कि
ती मोठी सजा असते......
माझ्या भावनांना
सार्थ तूच आहेस,
माझ्या प्रत्येक शब्दाचा
अर्थ तूच आहेस......
तुझ्यावाचून जीवनाला
काय अर्थ आहे???
तूच एक सत्य
बाकी सगळे व्यर्थ आहे..