Sunday, September 18, 2011

ती असावी

Nits
कुठे म्हणालो परी असावी
कधीतरी पण घरी असावी

हवी कुणाला छचोर मैना ?
वरायला छोकरी असावी

तरुस घरदार मानणारी
अशी कुणी वानरी असावी

नको अवाढव्य बॅंड-बाजा
फुकायला बासरी असावी

नकोय काकूसमान पण ती
जरा तरी लाजरी असावी

नकोत लुगडी जुनेर सूती
कधी तरी भरजरी असावी

उसळ नको अन् नको आमट्या  :(
खमंग मुर्गी करी असावी

नको "वहाव्वा", "सुरेख", "उत्तम"
विडंबनं बोचरी असावी

विदीर्ण झालास 'खोडसाळा'
तिची जिव्हा कातरी असावी..

Friday, September 16, 2011

नाही विचारले मी तिला................

ती आवडली पण मी नाही विचारले तिला 
Delete करेल Friends लिस्ट मधून ती मला 
बोलणार नाही माझ्याशी म्हणून 
नाही विचारले मी तिला...............
चुकीच्या नजरेने पाहिलं ती मला म्हणून 
नाही विचारले मी तिला ...............
एक गैरसमज करून घेईल ती माझ्या बद्दलचा म्हणून 
नाही विचारले मी तिला ...............
समोर कसा जाणार तीच्या म्हणून
नाही विचारले मी तिला .............
भेटून सुद्धा नाही भेटणार म्हणून 
नाही विचारले मी तिला ................
कोणाला सांगूही  शकणार नव्हतो की किती आवडते ती मला 
कसा सांगणार मी तिला की खूप आवडतेस तू मला 
भीती वाटते एका नाही ची म्हणून 
नाही विचारले मी तिला .......................
आजुन किती Valentine Days निघून जातील पण 
नाही विचारणार मी तिला............. 
राहू दे मला या गोड अशा गैरसमजुतीत की आवडतो मी तिला .........आवडतो मी तिला ......