Monday, July 25, 2011

खूप दिवसापास्न चाललय डोक्यात...


जाऊ दे आता...
ठरवून काही कविता होत नाही..
खरंच..पटलय आता मनाला...

डोळ्यात पाणी दाटत...अश्रू सुसाट वाहतात...पण शब्द मात्र फुटत नाहीत..
पण ती असताना जमलच नाही कधी...
होतं कुणीतरी हक्काचं माझ्या...जिच्यासाठी कविता केली असती मी..

आणी झालंच जरी..तर कोण बसणारे बघत..आहे का तेवढा वेळ कुणाला..
देवालाही जरा आपल्या परीक्षेत नापास करावं..
कधी कधी वाटत..काही तरी मोठं...

प्रेम

प्रेम दोन शब्दांचे खेळ नसते,
निव्वळ छेद-छेडीची वेळ हि नसते,
खरंतर प्रेमाची प्रत्येकाची,
वेगळीच एक व्याख्या असते.....
प्रेम म्हणजे....
प्रत्येक श्वासात - प्रत्येक क्षणात,
प्रत्येक सुखात - प्रत्येक दुखात,
एक-मेकांना साथ देण्याची वेळ असते
प्रेम म्हणजे....
त्याचं तुझ्यावर - तुझं त्याच्यावर,
स्वतःही पेक्षा जास्त,
विश्वास असण्याची गरज....
प्रेम म्हणजे....
एक-मेकांचा आदर,
एक-मेकांच्या भावनेचा आदर,
एक-मेकांच्या शब्दांचा आदर असणे...
प्रेम म्हणजे....
एक-मेकांसाठी हसत - हसत मारण्याची,
कधी मरत - मरत जगण्याची,
एक-मेकासाठी सगळं काही त्यागायची वेळ...
प्रेम म्हणजे....
निर्मल मैत्री,
एक-मेकासमोर मन मोकळं करण्याची बेधडकता,
अतूट सोबत असण्याची खात्री....
प्रेम म्हणजे....
एक-मेकांत जीव गुंतवणे,
दोन शरीर एक आत्मा होणे,
एक जीव होणे...
प्रेम म्हणजे काय असतं,
प्रेम म्हणजे प्रेम असतं,
ते सगळ्यांच्याच नशिबात नसतं,
अन् ज्यांना मिळतं,
त्यांनी ते जीवापाड जपायचं असतं..
माझ्यासाठी प्रेम म्हणजे,
तुझ्या आठवणीत जगणे,
त्यांना जीवापाड जपणे,
फक्त त्यांना जपायसाठीच जगणे

तू का असं वागतेस ?

मला पाहुनसुध्दा न पाहिल्यासारखं करतेस,
तू का असं वागतेस ?

फोनवरून गप्पा करतेस आणि भेटल्यावर अबोली होतेस,
तू का असं वागतेस ?

भेटीला बोलविले तर तूच उशिरा येतेस
आणि मला वाट पहायला लावतेस,
तू का असं वागतेस ?

माझ्या बावळटपणांवर मात्र खुदकन हसतेस
आणि मी हसलो तर लगेच रागवतेस,
तू का असं वागतेस ?

माझे गुणदोष दोन्ही मान्य करतेस
आणि तुझे गुणदोष मात्र तू लपवतेस,
तू का असं वागतेस ?

'प्रेम' माझ्यावर करतेस आणि
तेहि तू तुझ्या नखयातून दाखवतेस,
तू का असं वागतेस ?